पुस्तकातील पात्र, लेखक, चित्रकार, प्रकाशक हे मुलांसाठी महत्वाचे झालेत. आम्हाला सांगायला आवडेल कि, माधुरी पुरंदरे ह्या आमच्या मुलांच्या सर्वात आवडीच्या आणि लाडक्या लेखिका. त्यांची पुस्तके वाचतांना मुलं पुस्तकमयी जगात एकदम हरवून जातात. म्हणूनच या डिजीटल युगात सुद्धा पुस्तकं आमच्या मुलांचे लाडके मित्र झालेत.
तुम्हाला माहिती आहे का? आमच्या सेंटर मध्ये ‘पुस्तकांचा दवाखाना’ आहे. विश्वास बसला नाही ना! अहो ज्या प्रमाणे माणसे आजारी पडली तर ते कसे दवाखान्यात जातात. औषधं घेतात आणि बरे होतात त्याप्रमाणे पुस्तकं सुद्धा आजारी पडतात, फाटतात, जीर्ण होतात, त्याचा कणा मोडतो इत्यादी. मग जेव्हा ती आजारी पडतात तेव्हा आम्हीच त्यांचे डॉक्टर होतो. कारण ते आता आमचे मित्र आहेत ना! कालपासून मुलं आणि ताई दादा मिळून पुस्तकांना कव्हर घालून त्यांना ताजे करण्याचे काम बालनगरी मधे नुकतेच सुरू झाले आहे. आपण मुलांसोबत काम करत असाल. तुमच्या मुलांना पुस्तके वाचायला खूप आवडत असेल त्यांनी हा दवाखाना नक्की तयार करावा. त्यातून मुलांना पुस्तकाबद्दल प्रेम, काळजी, जवळीकता निर्माण होईल जी त्यांना आयुष्यभर उपयोगी येऊ शकते. आणि पुस्तकासाठीचा दवाखाना हि संकल्पना कशी वाटली ते आम्हला प्रतिक्रिया च्या माध्यमातून नाकी कळवा!
#बालनगरी #ओवी_ट्रस्ट#धनगरवाडी #यवतमाळ
www. oveetrust.org
No comments:
Post a Comment